रावेरसामाजिक

बंजारा समाजाची ” होळी ” सणाला आजपासून सुरुवात

पाल,तालुका- रावेर, मंडे टू मंडे न्यूज़ प्रतिनिधि l रावेर तालुक्यातील पाल येथे वर्षानुवर्षा पासून होळी सन हां सर्वात मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पासून होळी सणास सुरुवात करण्यात आली. तसेच पाल गावात मागच्या होळी नंतर आज पर्यंत जेवढे लोक मयत झाले त्यांच्या घरी गावातील पंचमंडळी जाऊन त्यांच्या परिवाराला नवीन सणाच्या सातवणा देऊन त्यांना उत्सवात साजरे व्हा असे प्रेरित करतात.

होळी सण हा बंजारा समाजाचा एकमेव सर्वात मोठा सण आहे या सणानिमित्त गावातील पंचमंडळी गावातील मयत व्यक्तींच्या घरी जाऊन आड तोडणे असे म्हणतात म्हणजे शिवरात्रीच्या आधी गावातील लोक त्यांच्या घरी येऊन सातवना देतात त्यानंतर ते उत्सव साजरा करतात आणि होळी हा सण तसेच महाशिवरात्री हा सण साजरा करतात तसेच होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर गावातील पंचमंडळी तसे गावातील नागरिक गावात एका वर्षात जन्मलेल्या मुलांचे म्हणजे होळी नंतर जेवढे मुले जन्मले त्या मुलांच्या धुंड असा कार्यक्रम मंत्र बोलून म्हणजे बंजारा समाजात जोडी परंपरानुसार साजरा करण्यात येतो त्या प्रमाणे कार्यक्रम करण्यात आला. 

या कार्यक्रमाला पाल येथील श्री रघुनाथ चव्हाण, अभिराम पवार, मयाराम संग्राम पवार, छगन पांडू राठोड, करण सिंग शंकर जाधव, दिनेश गुलाब जाधव , करण सिंग मांगो पवार, काशीराम रामसिंग चव्हाण, तसेच गावातील ज्येष्ठ व तरुण नागरिक उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!