भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराजकीयरावेर

आमदार पुत्रांमंध्ये प्रतिष्ठेची लढाई, तिरंगी लढतीत रावेर मध्ये कोण बाजी मारणार..आता प्रतीक्षा निकालाची

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकाचे मतदान पर पाडलं. आता प्रतीक्षा आहे निकालाची. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रावेर विधानसभा मतदार संघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक दोन आमदार पुत्रांच्या प्रतिष्ठेची निवडणूक गणली जात असून प्रहारचे अनिल चौधरी यांनी सुद्धा ह्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली आहे .

रावेर विधानसभा निवडणुकीत अमोल हरीभाऊ जावळे हे भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी काँग्रेस, या पक्षाच्या महायुतीचे उमेदवार असून धनंजय शिरीष चौधरी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, शिवसेना ( उबाठा ) व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार, तर अनिल छबिलदास चौधरी हे प्रहार जनशक्तीच्या तिसऱ्या आघाडीचे उमेदवार म्हणून यांनी निवडणुक लढविली. या प्रमुख ती पक्षांसह या सोबत वंचितच्या शमीभा पाटील व अपक्ष दारा मोहम्मद याच्या सह इतर अपक्ष उमेदवार देखील रिंगण्यात आहेत.

मोठ्या चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत खरी लढत ही महायुतीचे अमोल जावळे, महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी व प्रहार जनशक्तीच्या तिसऱ्या आघाडीचे अनिल चौधरी यांच्यात तिरंगी लढत आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जात आहेत. मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असुन निकालाची उत्सुकता शिगेला पहोचली आहे सर्वच पक्षांनी आमचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत दावा केला आहे. दिनांक २० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या रावेर विधान मतदारसंघातील ३ लाख ९ हजार पैकी २ लाख २७ हजार मतदारांनी आपल्या मतदानांचा हक्क बजावला आहे.

रावेर विधानसभेच्या गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ६९ .३४ टक्के मतदान झाले होते. २ लाख ३ हजार ४२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यात काँग्रेसचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांना ७७ हजार ९४१ मते मिळाली होती तर भाजपचे हरिभाऊ माधव जावळे यांना ६२ हजार ३३२ मते मिळाली होती तसेच अपक्ष उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांना ४४ हजार ८४१ मते मिळाली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिरीष चौधरी हे विजयी झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे  पक्षाचे हरिभाऊ माधव जावळे ६५,९६२  मते मिळवून विजयी झाले होते. काँग्रेस पक्षाचे चौधरी शिरीष मधुकरराव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळून ते १० हजार मतांनी पराभूत झाले होते.

मतमोजणीला काही तास उरले असताना रावेर विधानसभा मतदार संघात कोण बाजी मारणार हे येत्या काही तासातच कळणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!