भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईमराष्ट्रीय

सावधान व्हा! आमिष मोफत कोरोना टेस्टचे आणि होईल बँक खाते हॅक !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोना व्हायरसच्या काळात आरोग्य विषयक संकटासोबतच आर्थिक संकट देखील निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी कोरोनाच्या नावाखाली लुट सुरू असल्याच्या बातम्या येत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना संकटात तुमच्या भावनांचा आणि परिस्थितीचा फायदा घेऊन फसवणूक केली जात आहे. संपूर्ण देश करोनाशी लढत असताना काही लोक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरनामुळे काळात मोफत चाचणीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे.

कोरोना काळात सर्व जण स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहेत. अशातच करोनाची मोफत चाचणी करून देणार असे कोणी सांगितले तर कोणालाही आनंदच होइल. मोफत कोरोना चाचणीसाठीचे मेल अनेक वेळा ncov2019@gov.in या सारख्या आयडीद्वारे पाठवले जातात. अशा मेलचा विषय subject: Free Covid-19 testing for all residents of DElhi, Mumbai, Hyderabad, Chennai and Ahmedabad असा देखील असू शकतो. या मेलमध्ये तुमची माहिती विचारली जाते. पण येथेच तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. नाही तर तुमचा स्मार्टफोन, संगणक हॅक होऊ शकतो आणि त्याद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. गेल्या काही दिवसात अनेकांना अशा प्रकारचे फसवण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. यासंदर्भात सर्व बँकांनी ग्राहकांना याआधीच अलर्ट केले आहे. आता विदेशीतील बँका देखील अशा प्रकारचे आवाहन करत आहेत. सिटी बँकेने त्यांच्या ग्राहकांना अशा पद्धतीचा मेसेज पाठवला आहे. सरकारने या संदर्भात एक नियमावरील प्रसिद्ध केली होती. अशा प्रकारच्या इ-मेलमध्ये संबंधित फसवणूक करणारे एका अशा वेबसाइटची लिंक देतात ज्यातून तुमच्या स्मार्टफोन अथवा संगणकामध्ये व्हायरस येतो. मग त्या माध्यमातून माहिती मिळवली जाते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!