दारूबंदीची तक्रार देणाऱ्यास मारहाण, मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा वचक संपला ?
मुक्ताईनगर– मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील चांगदेव येथे दारू विक्री बंद करण्यासंदर्भात ज्या व्यक्तीने तक्रार केली होती त्यास काल दुपारी साडेचार वाजता मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांनी विरोधात आवाज उठवल्याने त्यांना मारण्यापर्यंत मजल जात असेल तर मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा वचप संपला आहे का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चांगदेव येथील मासेमारी व्यवसाय करणारे तुषार रामचंद्र ठाकरे (वय 32 वर्षे ) यांनी चांगदेव शहरात मोठ्या प्रमाणात अवैधपणे सुरू असलेल्या दारू विक्रीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. इतकेच नाहीतर चांगदेव ग्रामपंचायतमध्ये ठरावही पारित करण्यात आला होता दारुमुळे परिसरातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत इतकेच नव्हे तर गेल्या दीड महिन्यात तीन ते चार तरुणांनी दारूमुळे जीव गमावला आहे परिसरात यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सावकारी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे आत्महत्यांच्या घटनांमध्ये ही वाढ होताना दिसून येत आहे यापुढे तरी सदरच्या घटना होऊ नयेत किंवा संसार उध्वस्त होऊ नये त्यासाठी तक्रार दाखल केली होती फिर्यादी तुषार रामचंद्र ठाकरे मासे विक्री करत असताना त्यांच्या दुकानासमोर येऊन ग्रामपंचायत मध्ये दारूबंदीचा अर्ज का दिला? असे म्हणून दारूच्या नशेत संशयित आरोपी अनिल मसाने व वाघ्या पूर्ण नाव माहित नाही यांनी चापट बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा संपला वचक ..? गुन्हेगारांची मजल तक्रारदारांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचली असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा वचक आहे काय ? असा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय? की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पाठीशी घालणार? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा संपला वचक ..? गुन्हेगारांची मजल तक्रारदारांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचली असल्याने मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचा वचक आहे काय ? असा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय? की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पाठीशी घालणार? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
पोलीस निरीक्षक मात्र सिक रजेवर ? — मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक म्हणून शंकर शेळके यांची गेल्या काही महिन्यांपूर्वीच नेमणूक करण्यात आलेली आहे परंतु गेल्या एक ते दीड महिन्यापासून ते सिक रजेवर असल्याने अद्यापही रुजू होऊ शकलेले नाही त्यांच्या ठिकाणी प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून विठ्ठल ससे यांची नेमणूक करण्यात आली आहे परंतु यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहेत. इतकेच नव्हे तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सामान्य व्यक्तींना मारहाण होत असल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.