भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीयराष्ट्रीय

उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…..; काय ते एक ठरवा! शिंदेंना भाजपाच्या दोन ऑफर

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी भेट घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप १३२, शिवसेना ५७ ते राष्ट्रवादी ४१ अशा जागा पटकावत २३० जागा मिळवत मोठं अभूतपूर्व यश मिळावलं.

परंतु मुख्यमंत्री कोण ? या संदर्भातील तिढा सोडवण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदें व अजित पवारांनी सत्तेत आपल्याला कसा वाटा अपेक्षित आहे याबद्दलची भूमिका या नेत्यांसमोर ठेवली.

शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडताना १२ मंत्रिपदांची मागणी केली. विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. गृहमंत्रिपदाबरोबरच नगरविकास आणि इतर महत्वाची खाती शिंदेंनी मागितली. तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंती शिंदेंनी अमित शाहांकडे केली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या वेळी १३२ मिळऊन सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानेही या दोन्ही मित्र पक्षांना सत्तेतील वाटेकरी म्हणून काय काय देऊ शकतो याची माहिती दिली. या बैठकीमध्ये भाजपाने शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं सांगितल. एकनाथ शिंदें याना या बैठकीत भाजपाने दोन ऑफर दिल्याची माहिती मिळत असून या बैठकीमध्ये भाजपाने काही मुद्दे शिंदे आणि अजित पवारांना अगदी स्पष्टपणे सांगितल्याचीही माहिती समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!