भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

दहा हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आईच्या नावे असलेली जमीन व घर तलावात गेल्याने त्या घराची आणि जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे याना रंगेहात पकडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली. या बाबत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेली जमीन व घर हे गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख ३८ हजार ९६५ रूपये एवढी नुकसान भरपाई मिळावा, यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता. परंतू, उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने आज दुपारी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सागरे यांनीच वसूलीसाठी नेमलेला सेवा निवृत्त मंडळा अधिकारी नवनाथ प्रभाकर सरवदे याच्याकडे लाच देण्यास सांगितले. लाचेची रक्कम स्विकारताच एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!