भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

सहायक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात

बीड,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। पोलीस तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तर तडजोडअंती 15 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करण्यात आले. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस नाईकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या ग्रामीण पोलिसस्टेशनचे सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद प्रताप सेंगर (ठाकूर) वय 51 ,व पोलीस नाईक नितीन चंद्रकांत चौरे ,वय 33, यांनी तक्रारदारास त्यांचे कुटुंबियांवर शेतीचे कारणावरून दाखल गुन्ह्यात तपासात मदत करून, पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी व प्रतिबंधक कारवाई तहसीलदार कार्यालय अंबाजोगाई येथेच करण्यासाठी 25 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 15 हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. ही लाच 28 फेब्रुवारी 2022 रोजी मागितली होती. 2 मार्च 2022, 3 मार्च 1 एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली. म्हणून याबाबत अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!