खळबळजनक ; बलात्कार झालेल्या अल्पवयीन पीडित मुलीला चक्क शाळेतूनच काढलं
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बलात्कार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीला चक्क शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड मध्ये उघडकीस आला आहे. पिडीतेच्या वडिलांना शाळेने तीन वेळा फोन करून बळजबरीने मुलीची टीसी घेवुन जा म्हणुन सांगितले. तसेच टीसी देण्यासाठी आमच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचे शाळेने सांगितल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे शैक्षणिक विभागात खळबळ उडाली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माझा आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही. माझ्या नावाचा गैरवापर कोणी केला असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून सांगितलं.
मुलीला शाळेतून काढून टाकण्यासाठी आमच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा दावा शाळेने केला असल्याचे पीडीतेच्या वडिलांना जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अर्जात म्हटले आहे. अल्पशिक्षित वडिलांनी भीतीपोटी शाळेतून दाखला घेतला. तेव्हापासून मुलीची शाळा बंद आहे. बलात्काराच्या घटनेने आधीच मानसिक तणावात असलेल्या मुलीची शाळा बंद झाल्याने मुलगी अधिकच खचली आहे.
बीड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर काही महिन्यांपूर्वी पळवून नेत बलात्कार केला गेला. या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला,आरोपीसही अटक झाली. मात्र यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांना शाळेने तीन वेळा कॉल करून मुलीचा टीसी घेऊन जाण्यास भाग पाडले. वडिलांनी का असा प्रश्न विचारला असता आमच्यावर जिल्हाधिकारी यांचा दबाव असल्याचं कारण देखील शाळा व्यवस्थापनाने दिल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक रामहरी कदम यांना विचारले असता विनंती अर्जावरूनच टी सी दिला आहे. आमच्याकडे विनंती अर्ज आहे असे फोनवरून सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करू असं शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सांगितलं.