अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरणार्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करून जाळले
बीड,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला होता. हा मृतदेह पुरुषाचा की स्त्रीचा हे देखील ओळखणं अवघड झालं होत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावर लाडे वडगाव शिवारात 3 एप्रिल रोजी जळालेल्या अवस्थेत अज्ञात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कडब्याच्या गंजी सोबत या मृतदेहाला आग लावण्यात आली होती. त्यामुळे हा मृतदेह पुरुषाचा का स्त्रीचा हे सुद्धा ओळख पटवणे अवघड होते.या धक्कादायक प्रकरणात अनैतिक संबंधाना अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आणि ईथूनच तपास कार्याला सुरुवात झाली
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करत होते. त्यांनी तपासाची चक्रे गतीमान करत मृताची ओळख पटवली. हा मृतदेह विठ्ठल उर्फ अशोक धायगुडे (वय 35 रा. औरंगापूर ता. केज) यांचा असल्याचे निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. तिनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे समोर आलं. आरोपी पत्नी सुमेधा विठ्ठल धायगुडे (वय 32) आणि तिचा प्रियकर रामदास किसन शितळकर (वय 22 दोघे रा. औरंगपूर) यांना औरंगपूर इथून ताब्यात घेतले. अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचं समोर आलं. आपला पती बेपत्ता तरीही पत्नीने ना तक्रार केली ना शोधण्याचे प्रयत्न
केज तालुक्यातील औरंगपूर इथल्या विठ्ठल उर्फ अशोक धायगुडे हे मागच्या 25 दिवसांपासून घरातून गायब होते. त्यांचा कुठेही थांब पत्ता लागत नव्हता तरीही अशोक धायगुडे यांच्या पत्नी सुमेधा धायगुडे यांनी या प्रकरणाची ना कुठे तक्रार केली ना त्यांना शोधण्यासाठी कोणते प्रयत्न केले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर अशोक धायगुडे यांच्या पत्नी सुमेधा धायगुडे यांच्याकडे कसून चौकशी केली. सुमेधा आणि किसन शितळकर यांचे अनैतिक संबंध होते आणि याच संबंधांमध्ये अशोक धायगुडे हा अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली या दोघांनी दिली.