धक्कादायक;तब्बल 400 जणांकडून बालविवाहितेवर अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बीड, मंडे टू मंडे वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी डोंबिवली या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. त्यातच आता राज्याला हादरवून सोडणारी अमानुषतेच्या परिसीमा गाठणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ८ वर्षाची असताना तिची आई मरण पावली, वडिलांनी १३ व्या वर्षीच बालविवाह लावून दिला. विवाहानंतर पतीच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून माहेर गाठले. तर वडिलांकडून लैंगिक छळ होऊ लागला म्हणून घर सोडले. तर जेवण देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तसेच रस्त्यावर अनेकांनी शरीराचे लचके तोडले. त्यात लॉजवर पोलिसांनी पकडले तर त्यानी देखील अत्याचार केल्याची आपबीती पीडितेने सांगितली आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार करणारे 2 आरोपी, पती, वडील, चुलते, भाऊ, नंनद यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीचा अल्पवयीन विवाह केल्याप्रकरणी, तिच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीचा पुरवणी जबाब नोंदवला जाणार असून अत्याचार करणाऱ्या अन्य आरोपींची नावे यामध्ये उघड होणार आहेत. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.