क्राईमजळगाव

खोटे नाव सांगून तरुणीशी मैत्री, आक्षेपार्ह फोटो व्हायलर करण्याची धमकी देत शरीर सुखाची मागणी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अल्पवयीन मुलीला खोटे नाव सांगून तिच्याशी मैत्री करीत तिच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढून व्हायलर करण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग करून शरीर सुखाचीही मागणी केली. या प्रकरणी आयान शेख नूर मोहम्मद (१९, रा. गेंदालाल मिल परिसर) याला एमआयडीसी पोलीस पोलिसांनी अटक केली.

जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला आयान शेख याने विशाल शर्मा असे खोटे नाव सांगून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो व्हायरलची धमकी देत २६ मार्च रोजी पुन्हा अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. त्यानंतर धमकी देत शरीर सुखाची मागणी केली.


नेहमीच्या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून आयान शेख याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!