भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

दारुड्यांचं अनोखं आंदोलन ; दारुडा न बोलता मद्यपी असं आदराने बोलावं,मद्यप्रेमीना समाजात आदराची वागणूक मिळावी

बेळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपण आतापर्यंत कित्येक आंदोलनं बघितली असणार, आंदोलनांमध्ये केल्या जाणाऱ्या मागण्या या पूर्ण देखील होतात. त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करण म्हणजे न्याय मागणं, पण बेळगावात झालेलं एक अनोखं आंदोलन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरलाय. ते आंदोलन ना कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते ना सामाजिक कार्यकर्त्यांनी केले नाही. तर हे आंदोलन थेट मद्यप्रेमींनी केलं आहे. इतकचं नाही तर त्यांनी हे आंदोलना द्वारे काही मागण्या देखील केल्या आहेत.बेळगावात या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

दारू पिणाराला दारुडा न बोलता मद्यपी असं आदराने बोलावं, मद्यपींना समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. अशा मागण्यांसाठी कर्नाटकातील बेळगाव मध्ये कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने आंदोलन करुन केली आहे. इतकंच नव्हे तर आंदोलनकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, तर मद्यप्रेमींनी कामगार मंत्री संतोष लाड यांना यासंदर्भात निवदेन देखील दिले आहे.

मद्यप्रेमींच्या मागण्या काय?
बेळगावातील सुवर्णसौध परिसरात १५ डिसेंबर रोजी मद्यप्रेंमींनी आंदोलन केले. मद्यप्रेमींमुळे दरवर्षी सरकारला छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो असा दावा या मद्यप्रेमींनी केला असून या मद्यप्रेंमींमुळे सरकारला जो दरवर्षी छत्तीस हजार कोटी रुपयांचा कर मिळतो त्यातील दहा टक्के रक्कम ही मद्यपींच्या कुटुंबियांसाठी आणि मद्यपी आजारी पडल्यास त्यांच्या साठी खर्च करावा अशी अनोखी आणि जगावेगळी मागणी या मद्यप्रेंमींनी केली आहे ,तसेच मद्य दुकानात छापील किंमतीपेक्षा अधिक रक्कम घेऊ नये. मद्यप्रेमी आजारी पडल्यास त्याचा वैद्यकीय खर्च सरकारने करावा. अन्य महामंडळांप्रमाणे मद्यप्रेमी कॉर्पोरेशनची स्थापना करुन मद्यप्रेमींना दिलासा द्यावा अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने केली आहे. मद्यप्रेमी संघटनेचे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरलंय. मद्यप्रेमींच्या या मागण्या ऐकून निवदेन स्विकारणाऱ्या मंत्र्यांना देखील हसू आवरले नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!