भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळयावलरावेर

‘ त्या ‘ नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क भरारी “वसुली” पथकाचा आणखी एक कारनामा समोर

सावदा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क भरारी “वसुली” पथक नुकतेच गेले तीन दिवस जळगाव जिल्ह्यात भरारी मारून  गेले, ते भरारी पथक कशासाठी आले होते याबद्दल कोणीही महिती सांगू शकले नाही, मात्र भरारी पथक फक्त ” वसुली” साठी आल्याची पक्की खात्री झाली आहे. आलेल्या तथाकथित पथकानं तपासणीच्या नावाखाली कारवाई करण्याचा बडगा उगारत मोठ्या प्रमाणावर “वसुली” केल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्या नंतर भरारी पथकाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे.

नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक तपासणीच्या नावाखाली सावदा, फैजपुर, रावेर, यावल परिसरासह भुसावळ विभागातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात गेले तीन दिवस फिरत होते. यानी या वेळात तपासणीच्या नावाखाली देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियर बार वरून कारवाई करण्याचा बडगा उगारत मोठ्या प्रमाणावर “वसुली” केली. या वसुलीची चर्चा भुसावळ विभागासह जिल्ह्यात चर्चिली जात आहे.

भरारी उर्फ वसुली पथक नकली तर नव्हे?          दरम्यान, स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा या बाबत कुठलीही माहीती नसल्याची माहिती मिळत आहे. हे नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच भरारी उर्फ “वसुली”  पथक नकली तर नव्हे? असा  प्रश्न उपस्थित केला जात असून या वसुली पथकांची भुसावळ विभागासह जिल्ह्यात मोठी चर्चा रंगत आहे.

या नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. या भरारी पथकाने फक्त देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियरबार वरूनच वसुली केली नाही तर भुसावळ विभागासह जिल्हाभरात खाजगी ढाबे, हॉटेलिंची सुद्धा तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. ज्या हॉटेल किंवा ढाब्यावर दारूच्या बाटल्या सापडल्या त्यांचेवर कारवाईचा बडगा दाखवत वसुली केली, इतकेच नव्हे तर खाली रिकामी दारूची बाटली जरी सापडली त्यांचेकडून वसुली केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, एक विशेष म्हणजे देशी, विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियरबार याना कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत याबद्दल माहिती कशी ? किंवा कुठल्या ढाब्यावर व हॉटेल वर दारू विकली जाते. याची माहिती याना कशी मिळली. याना  कोणी तरी स्थानिक मार्गदर्शक असावा ? असे संपूर्ण जिल्ह्यात बोलले जात असून जिल्ह्यातील सर्व देशी,विदेशी, वाईन शॉप, परमिट रूम बियारबर सोबत ढाबे, हॉटेल्स ची सर्व माहिती घेऊन भरारी पथकाने दौरा नियोजित केल्याची बोलले जात असून हे भरारी पथक होते की “वसुली”  पथक यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर ठीक ठिकाणी होत असून या बाबत नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!