शेगावात ११ जानेवारी रोजी भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन, एकत्रीकारणासाठी सर्व समाजाने सहभागी व्हावे – राहुल चोपडे
नांदुरा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाट समाजाच्या प्रगतीसाठी तसेच एकत्रीकरण करून सर्वांगीण विकासासाठी अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या वतीने ११ जानेवारी २०२५ रोजी माळी भवन शेगाव येथे भाट समाज राज्यस्तरीय अधिवेशन व वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे भाट समाजाच्या विकाससाठी सर्व भाट समाज बांधवांनी शेगाव येथील राज्यस्तरीय अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे सचिव राहुल चोपडे यांनी केले आहे.
शेगाव येथे आयोजित भाट समाजाच्या राज्यातील राज्यस्तरीय अधिवेशनात प्रथम १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रम व समाज बांधव यांचा स्नेह भोजन राहील त्यांनतर ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता पासून कार्यक्रमाला सुरुवात होईल. यामधे दिंडी, दिप प्रज्वलन, उद्घाटन , प्रार्थना, त्यांनतर परिचय मेळावा व कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनात समस्त भाट समाजाचे एकत्रिकरण व एकजुटीने सामाजिक विकास साधने. राज्यभरातून एकत्र येणाऱ्या विविध जिल्ह्यातील समाज बांधवासोबत परिचय व वैचारिक देवाण घेवाण. समाजातील युवा वर्गाचे उज्वल भविष्याच्या दृष्टिने विचार विनिमय व योजना. समाजातील महिलांकरिता त्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टिने महिला सक्षमीकरण धोरण ठरविणे. समाजातील उपवर मुला-मुलींचे परिचय आणि वधु-वर परिचय पुस्तीकेचे विमोचन. भाट समाज संगणकीय वेब साईटचे विमोचन होणार आहे
तर आपण सर्वच ह्या समाजाचे पायीक आहात व सिध्दही आपणासच व्हायचे आहे. आपली असंख्य कुटूंबे विकासापासूनच नव्हे तर सर्वच स्तरावर मागास आहे. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी राज्यातील भाट समाजाचे एकत्रिकरण होणे गरजेचे आहे व हेच ह्या मेळाव्याचे उद्दिष्ट्ये असणार आहे. त्यामुळे सर्व भाट समाजाने सहभागी व्हावे,असे आवाहन राहुल चोपडे व अखिल महाराष्ट्र भाट समाजाच्या वतीने केले आहे.