स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधीतून कुसुंबा येथे भव्य गणपती मंदिर – सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !
अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश...
रावेर (प्रतिनिधी)। काल कुसुंबा तालुका रावेर येथे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या निधीतुन मंजूर झालेल्या गणपती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन राम जन्म भूमी शिलान्यासाच्या शुभ दिवसाचे औचित्य साधून प. पु.भरतदासजी महाराज आणि प. पु.विजय महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
कुसुंबा ग्रामस्थांच्या मागणीनुसार तत्कालीन आमदार स्व.हरीभाऊ जावळे यांनी गणपती मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामासाठी आचार संहिता लागण्याच्या काही दिवस अगोदरच ७ लाख रुपये इतका निधी मंजूर करुन आणला होता.पण नंतर त्यांना दुर्दैवाने निवडणूकीत पराभव पत्कारावा लागला.तरी त्यांनी सातत्याने निधी साठी सबंधित अधिकारी आणि विभागाशी पाठपुरावा सुरुच ठेवला त्यातच जुन महिन्यात त्यांचे अचानक दुखद निधन झाले.यानंतरही त्यांचे पुत्र अमोल जावळे यांनी सबंधित विभागाशी पाठपुरावा करुन सदर निधी उपलब्ध करून घेतला.याच माध्यमातून काल भव्य गणपती मंदिर सभागृहाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.
स्व.हरीभाऊ आज या जगात नसले तरी त्यांच्या या सद्कार्यामुळे ते कायमच कुसुंबा वासियांच्या स्मरणात राहतील अश्या प्रतिक्रिया उपस्थित ग्रामवासियांनी दिल्या.या प्रसंगी कुसुंबा गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या वेळी सरपंच मुबारक तडवी,उप सरपंच सुरेश पाटील,फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे,गिरीश पाटील,तुषार जावळे,मयुर पाटील,कुणाल कोल्हे ,तेजस नारखेडे,तेजस महाजन,ऋषिकेश पाटील,विशाल धनगर
आणि समस्त कुसुंबा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.