जागृत शिरसाळे देवस्थान येथे विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : बोदवड तालुक्यातील जागृत हनुमान मंदिर शिरसाळे यांस आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी ४० लक्ष रुपयाच्या विकासकामाचे भूमिपूजन हनुमान जयंतीचे औचित्य साधून आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत व नवसाला पावणाऱ्या हनुमान देवस्थान हे गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही शासनाच्या निधी अभावी स्वयंभू प्रकारे विकसित होत होते परंतु येथे बऱ्याच असुविधा भाविकांना येत असल्याने या देवस्थानाचा जिल्हा वार्षिक योजनेतील तिर्थक्षेत्र पर्यटन मध्ये समावेश करन्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून श्रीक्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिराचा क दर्जाचे तिर्थक्षेत्र मध्ये समावेश केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याअंतर्गत दि.१६ एप्रिल रोजी शनिवारी असलेल्या हनुमान जयंतीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र शिरसाळा हनुमान मंदिर येथे जिल्हा वार्षिक तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम तसेच मंदिराचे सुशोभिकरण करणे व हायमस्ट लॅम्प बसविणे या विविध ४० लक्ष रू.च्या विकास कामांचे कामाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी काँग्रेसचे डॉ जगदीश पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, काँग्रेस युवकचे हितेश पाटील , शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, बोडवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे , बोदवड शहरप्रमुख राहुल शर्मा, इतर शिवसेना पदाधिकारी हनुमान मंदिर संस्थान अध्यक्ष पाटील व विशवस्त तसेस हनुमान भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.