भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

अल्पवयीन तरुणीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा,भुसावळ न्यायालयाचा निर्णय

भुसावळ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी बोदवड तालुक्यातील आरोपी पुरुषोत्तम उर्फ अमोल गजानन बनारे, रा मनुर बू. तालुका बोदवड याला भुसावळ विशेष न्यायालयाने ७ हजारांचा दंड व ७ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी पुरुषोत्तम उर्फ अमोल बनारे याने पिडीत तरुणीवर २ ऑगस्ट २०१७ रोजी अत्याचार केला होता. तसेच सदर घटनेला विरोध करणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता

सरकारी पक्ष कडून सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. संजय डी सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षाकडून पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी डॉ नम्रता अच्छा. पोलिस निरीक्षक यांची साक्ष महत्वाची ठरली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!