भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावल रेल्वे अभियंत्यांच्या घरावरील CBI च्या धाडीत सापडली ५० लाखांची रोकड

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावल, मंडे टू मंडे वृत्तसेवा। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील एक अभियंता व अन्य एकाला मंजूर निविदाची वर्क आॅर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजारांची लाच स्विकारतांना नागपूर येथील सीबीआय पथकाने केलेल्या कारवाईत दोघांना रंगेहात पकडले. कारवाई झालेल्या दोन्ही अभियंत्याच्या घरावर छापा मारल्यानंतर तब्बल ५० लाखांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, मध्य रेल्वेत विविध कामांची निविदा काढल्या जातात, भूसावळ विभागाच्या डिआरएम कार्यालयातून ठेकेदाराला मिळालेल्या कामाची वर्क आॅर्डर देण्यासाठी भुसावळ  मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग-१) एम.एल. गुप्ता व ओ.एस संजय रडे यांना त्यांच्या कार्यालतच सोमवारी दुपारी ४० हजार रुपयांची लाच स्विकारतांना अटक केली. नागपूर येथील सी बी आय पथकाचे उप अधीक्षक एस.आर. चौगुले व उप अधीक्षक दिनेश तळपे या अधिका-यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला होता. गुप्ता याने २ लाख तर रडे याने ४० हजारांची लाच स्विकारल्याचे रेल्वे सुत्रांनी सांगितले. पथकाने दोन्ही अधिका-यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात महत्वाची कागदपत्रे व सुमारे ५० लाख रुपयांची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!