भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ मध्ये अप्परपोलिस अधीक्षकांच्या पथकाकडून सट्टा-जुगारावर कारवाई.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी)। तालुक्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सट्टा जुगार अड्ड्यावर एकही कारवाई केली नसल्यामागचे रहस्य गुलदस्त्यातच आहे. भुसावळ शहरात स्थानिक गुन्हे शाखा पथक शहरात दाखल होऊन एकाच दिवशी पाच ठिकाणी कारवाई केली होती.पोलीस अधिकारी गप्प का बसले आहे.? बाहेर गावातील पथक शहरात दाखल होऊन कारवाई करीत आहे.

शहरातील पाणीगेट जवळील रिक्षा स्टॉप च्या आडोशाला रिक्षामध्ये कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती मिळल्यावरून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने जुगार अड्डयांवर छापा टाकून कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षकांचे पथक गुरुवारी भुसावळ शहरात दाखल होऊन पाणीगेट जवळील रिक्षा स्टॉपच्या आडोशाला रिक्षांमध्ये आरोपी इजाज मोहम्मद रशीद मोहम्मद ( वय ४१ रा – मुस्लिम कॉलनी ) हा कल्याण मटका नावाचा सट्टा जुगाराचा आकड्यांवर लोकांकडून पैसे स्विकारत सट्टा जुगाराचे खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आल्याने पोकॉ संजय बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकला आरोपीकडून सट्टा जुगार खेळण्याचे साहित्य तीन हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा मोबाईल,एक हजार रुपयांचा मोबाईल,शंभर रुपयांचे कँल्क्युरेटर,तीस हजार रुपयांची जुनी रिक्षा ( क्र एम.एच-१९ व्ही.०१६१ ) तसेच ४६,९७० रोख रक्कम असे एकूण ८१,०७० चा मुद्देमाल मिळून आला म्हणून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला, सट्टा-मटक्याच्या या गुन्ह्यात मालकाला आरोपी करणे गरजेचे असताना गुन्ह्यात मालकाचा उल्लेख कुठेही केलेला नसल्याने या बाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असून मालकाचे नाव वगळण्यात आल्याचे कारण गुलदस्त्यात आहे ?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!