भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

वर्षभरानंतर खुनाच्या गुन्ह्याची उकल,पत्नीनेच केली होती व्यसनी पतीची हत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा। व्यसनी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळ यास कंटाळून 46 वर्षीय विवाहितेने पतीचा खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे घडली. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी पत्नी सीमा गणेश महाजन (46) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी ही घटना घडली असलीतरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष लावला व बारकाईने झालेल्या पोलिस तपासानंतर मयताचा खून झाल्याची बाब स्पष्ट झाली. भाजीपाला विक्री करणारे गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) हे पत्नीला दारू पिवून सतत मारहाण करून शिविगाळ करीत होते त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी सीमा महाजन यांनी त्यांचा नायलॉन दोरीने गळा आवळला मात्र ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवत गणेश महाजन यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनादेखील सुरूवातीला या प्रकरणी संशय न आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र अभ्यासू डीवायएसपींकडे एडीबाबत कागदपत्रे येताच त्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचे सांगत यंत्रणा कामाला लागली व खूनाचा गुन्हा उघड केला.

पोलिस उपअधीक्षकांनी वर्षभरातच केली दोन खुनाच्या गुन्ह्यांची उकल
भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्षभरात दोन खुनांची यशस्वीपणे उकल केली आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवासी असलेल्या दीपक भगवान सपकाळे (24) या तरुणाचा घराशेजारील विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधानानंतर खून करण्यात आला होता. आरोपींनी मृतदेह नशिराबाद रेल्वे रूळावर फेकला मात्र ज्या पद्धत्तीने तरुणाचा मृतदेह घटनास्थळी आढळला ती पद्धत पाहून हा खूनच असल्याचा निष्कर्ष वाघचौरे यांनी त्याचवेळी काढला. मयताच्या मोबाईलवर आलेला अखेरचा कॉल, मयताची घटनास्थळी आढळलेली दुचाकी व तांत्रिक विश्लेषणानंतर हा खून डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी/तायडे (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधी संघर्ष बालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!