भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळसामाजिक

अंतर्नाद उषाचा एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम समाजासाठी आदर्शवत- माजी जि.प सद्स्य कृषीभूषण चौधरी

भुसावळ (प्रतिनिधी)। अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला अाहे.त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन लोकचळवळीचे स्वरुप देणे अपेक्षित अाहे.उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील.अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशन राबवत असलेला ‘एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजासाठी आदर्शवत उपक्रम आहे असे माजी जिप सद्स्य कृषीभूषण नारायण चौधरी यांनी बामणोद येथे नमूद केले.

अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाउंडेशन तर्फे गणेशाेत्सवात ‘एक दुर्वा समर्पणाची’ हा उपक्रम हाती घेण्यात अाला अाहे. त्यात सोमवारी बामणोद येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमधे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात अाले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विध्यार्थी यांच्या साठी ही मदत छोटी असली तरी लाख मोलाची आहे.अंतर्नादने विध्यार्थ्यांची गरज अाेळखून जाे उपक्रम राबवला अाहे, ताे पथदर्शी अाहे, असे माजी यावल पस सभापती डॉ.नरेंद्र कोल्हे यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून बामणोदच्या सरपंच पल्लवी केदारे,केंद्र प्रमुख सुरेश तायडे,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव केदारे,ज्येष्ठ नागरिक पांडुरंग महाजन मुख्याध्यापक मोहम्मद इसाक हजरत अली यांची उपस्थिती हाेती.अंतर्नादचे अध्यक्ष संदिप पाटील यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रकल्पप्रमुख अमितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.सुत्र संचालन जिवन महाजन यांनी तर अाभार समन्वयक भूषण झोपे यांनी मानले.

३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शिक्षक अर्शद हुसेन लियाकत अली, प्रकल्प समन्वयक निवृत्ती पाटील,योगेश इंगळे, प्रदिप सोनवणे,समाधान जाधव,उषा फाउंडेशनचे उपाध्यक्ष सौरभ जावळे यांचे सहकार्य लाभले. शाळेतील इयत्ता पहिली ते चाैथीच्या ३५ विध्यार्थ्याना प्रत्येकी ४ वह्या ,पाटी,पाटीची पेंसील,रंग पेटी,स्केल,पेन,पेंसील,खोडरबर,कंपास पेटी,मास्क, स्यानिटायझर असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात अाले.

अंतर्नाद आणि उषाची मदत कायम स्मरणात राहिल.
अंतर्नाद आणि उषा फाउंडेशनने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला अाहे या माध्यमातून गरीब आणि गरजू विध्यार्थ्याना मोठी मदत होणार आहे.या माध्यमातून या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.अंतर्नाद आणि उषा फाउंडेशनची मदत कायमच आमच्या आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणार आहे असे बामणोदच्या सरपंच पल्लवी केदारे यांनी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!