भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबोदवळभुसावळ

बालविवाह प्रकरणी ब्राम्हणासह पाच आप्तांवर गुन्हा दाखल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ/ बोदवड,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मुलीचे लग्नाचे वय नसताना भुसावल तालुक्यातील शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावला ऊन दिल्याप्रकरणी ब्राम्हणासह पाच आप्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील तरुणासोबत भुसावळ तालुक्यातीलच शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला ,हा विवाह बोदवड येथे नातेवाईकांच्या संमतीने पार पडला होता.बोदवडच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शिंदी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह बोदवड येथे झाल्याची माहिती मिळाली.या संदर्भात बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी चौकशी केली असता बालिकेची जन्म तारीख २६ नोव्हेंबर २००६ असल्याचे दिसून आले. म्हणजेच बालिकेचे वय केवळ १५ वर्षे तीन महिने १७ दिवस असतांनाही मुलगी अल्पवयीन आहे हे समजत असतांनाही लग्न लावून दिले.या प्रकरणी ब्राह्मणासह मुलीच्या पाच आप्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!