भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

गणरायाला निरोप देताना तापी नदी पत्रात पाय घसरून चिमुकलीचा मृत्यू

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील झेटीएस स्मशानभूमी परीसरातील तापी नदीकाठाजवळ दिड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण नयनांनी निरोप देत असताना नदीपात्रात पाय सरकल्याने नऊ वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला तर 11 वर्षीय भावाला वाचवण्यात यश आले. ही घटना आज रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडलीय. अनन्या मनीष यादव (9) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

शहरातील झेडटीएस परीसरातील रहिवासी तथा रेल्वेतील रेल्वे टीटी मनीष यादव हे कुटुंबासह दिड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी तापी पात्रावर रविवारी सकाळी आले होते. यावेळी त्यांची मुली आर्यनराज व अनन्यादेखील सोबत होते. गणरायाचे विसर्जन करताना पाय निसटल्याने दोघे भावंडे पाण्यात पडली.

ही घटना पाहताच संत गाडगेबाबा हायस्कूलचे शिक्षक पाचपांडे यांनी पाण्यात उडी घेतली. यावेळी आर्यनराज यास वाचवण्यात यश आले मात्र अनन्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेली. या घटनेने या परीसरात मोठी खळबळ उडाली. यावेळी कंडारी पोलीस पाटील रामा यादव घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!