आ.संजय सावकारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून मित्रांच्या यादीतील लोकांकडून पैशांची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून यावरून फ्रेंड यादीतील मंडळकडून इनबॉक्समधून पैसे मागण्याचे प्रकार घडत आहेत. असाच प्रकारे भुसावळचे आ. संजय सावकारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून याद्वारे मित्रांच्या यादीतील लोकांकडून पैशांची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, आ. सावकारे यांनी सतर्कता दाखविल्याने हे अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे.
आमदार संजय सावकारे यांनी स्वतः फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसअँप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली आहे. हा सर्व खोडसाळपणाचा प्रकार असून कुणी याला बळी पडू नका असे आवाहन आमदार सावकारे यांनी केले होते. दरम्यान, आ. सावकारे यांनी याबाबत फेसबुककडे तक्रार केली. यामुळे काही तासांमध्येच हे बनावट अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.