अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : गुन्हा नोंद !
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञाता विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरांतील एका भागात वास्तव्यास असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ईला अज्ञात व्यक्तीने ५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आले नाही.
याप्रकरणी अखेर कुटूंबियांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहे.