अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हास्तरीय ऑनलाईन महावकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.वक्तृत्वाच्या विषय निवडीचे स्वातंत्र्य स्पर्धकांना देऊन एक वेगळा प्रयोग अंतर्नादने या वेळेस केला आहे.स्पर्धेचे यंदा पाचवे वर्ष आहे.
पहिला गट पहिली ते दुसरी साठी वेळ २ मिनिटे,दुसरा गट तिसरी ते चौथी साठी असुन वेळ ३ मिनिटे,तिसरा गट पाचवी ते आठवी साठी असुन वेळ ४ मिनिटे असणार आहे.चौथा गट नववी ते बारावी साठी असून वेळ ५ मिनिटे आहे, पाचवा गट हा खुला असून यात कुठल्याही वयोगटाची व्यक्ती सहभाग घेऊ शकते.वक्तृत्व मराठी, हिंदी, मराठी या पैकी कुठल्याही एका माध्यमातून करावयाचे आहे. स्पर्धकांनी भाषणाचा व्हिडीओ तयार करून अंतर्नाद प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरील शिवजयंती ग्रुप वर अपलोड करावयाचा आहे.व्हिडिओ तयार करून अपलोड करून पाठविण्याची मुदत ५ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२२ रात्री ८ वाजेपर्यंत असणार आहे.
वकृत्व स्पर्धा ५ गटात होणार असुन प्रत्येक गटातील ३ विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, पुस्तक देण्यात येइल.सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.स्पर्धेच्या दोन फेऱ्या होणार आहेत.प्रथम फेरी ऑनलाईन होणार असून दुसरी आणि अंतिम फेरी हि भुसावळ मध्ये प्रत्यक्षात ( ऑफलाईन ) असणार आहे आणि त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभ हि असणार आहे.स्पर्धक ७५८८८१५३८४, ७५८८००९४९२ या नंबर वर संपर्क साधू शकतात.
या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जीवन महाजन, समन्वयक शैलेंद्र महाजन तर सह समन्वयक म्हणून वंदना भिरूड असणार आहे. नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, प्रसन्ना बोरोले, समाधान जाधव, श्रीकांत जोशी, नाना पाटील, आनंद सपकाळे, अमितकुमार पाटील, अमित चौधरी, प्रा.श्याम दुसाने, देव सरकटे, विक्रांत चौधरी, भूषण झोपे, प्रा.भाग्यश्री भंगाळे, राजेंद्र जावळे, रोहिदास सोनवणे, निवृत्ती पाटील, राजू वारके, कुंदन वायकोळे, सुनील पाठक, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, हरीश भट,संदिप रायभोळे, विपश्यना सपकाळे, संदीप सपकाळे, मंगेश भावे आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील हे असणार आहे.