भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

BREAKING: सीबीआयची भुसावळात धाड : डीआरएम कार्यालयातील दोघे अधिकारी जाळयात !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय म्हणजे डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने आज सोमवारी दुपारी धाड टाकत मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंत्यासह एकाला एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना नागपूर सीबीआयच्या पथकाने अटक केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ शहरात रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये आज दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. यातील कारवाईचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी यात मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना भुसावळ डीआरएम कार्यालयातील सिनियर डिव्हीजनल इंजिनिअर एम. ए. गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधिक्षक संजीव रडे या दोन अधिकाऱ्यांना २ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना नागपूर सीबीआयच्या पथकाने आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्‍यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदारो नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती.

लाचेची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा यशस्वी करण्या आला. दरम्यान, दोघा अधिकार्‍यांच्या घराची सीबीआयकडून झडती सुरू असून त्यात काय सापडले याबाबत माहिती अजून कळू शकलेली नाही…

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!