व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Monday To Monday NewsNetwork।
भुसावळ (प्रतिनिधी)। शहराला लागून असलेल्या कंडारी परिसरातील अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत भुसावल शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला .
भुसावल शहरातील कंडारी भागात राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर २०१८ साली अत्याचार करून तिचा व्हिडीओ तयार करण्यात आला होता.तोच व्हिडीओ पुन्हा व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केला. अगदी आतापर्यंत म्हणजे १२ जुलै २०२१ पर्यंत तिच्यावर त्यांनी नॉर्थ कॉलनीतील खाली असलेल्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये वेळोवेळी अत्याचार केले. या बाबत पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली नव्हती. मात्र अत्याचार करणारे तिला वारंवार धमकावत असल्याने अत्याचार सहन न झाल्याने या पंडित मुलीने आज आपल्या कुटुंबियांना या बाबत संपूर्ण माहिती देऊन शहर पोलीस स्थानकात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील विशेष व धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करण्यात आलेली मुलगी ही अल्पवयीन असून तिच्यावर सामूहिक बलात्कार करणार्यांपैकी चार जण हे देखील अल्पवयीनच आहेत. त्या सर्वांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुबोध सुरेश यशोदे (वय २०) या तरूणाला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतर मुलाच्या वयाची पडताळणी करून कारवाईची प्रक्रिया केली जाईल, अत्याचार करणारे दोन्ही मुले हे पिडीतेचे वर्गमित्र आहेत. ओळखीतून सलगी वाढवत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.