Breaking : भुसावळात तब्बल २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त : मोठी कारवाई !
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर मधून तब्बल २ कोटी २७ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात असून तसेच एक कोटी २३ लाख रुपये किमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
संबंधित कारवाई गोपनीय माहितीच्या आधारे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक तयार केले. भुसावळ-साकेगाव दरम्यान तपासणी केली या वेळी साकेगावजवळील पेट्रोल पंपावर तीन कंटेनर उभे असल्याचे आढळून आले सखोल चौकशीसाठी पोलिस पथक कंटेनरकडे वळताच कंटेनरचालक पसार झाले. मात्र, एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले. या तिन्ही कंटेनरमध्ये गुटखा असल्याचे दिसून आले.
तिन्ही कंटेनर डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात पंचनामा करून जमा केले आहेत. या गुटखा नेमका कुणाचा याबाबत पोलीस तपास करीत असून राजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी पथकासोबत पकडल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तिन्ही कंटेनरचालकांना ऐनवेळी मोबाईलवर सूचना मिळत होत्या. त्यामुळे कंटेनर कुठे जाणार होते. याची माहिती निष्पन्न झालेली नाही. पोलिसांच्या ताब्यातील संशयीयतालाही त्याबाबत माहिती नाही. सूचना मिळाल्यानुसार कंटेनर मार्गस्थ केले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. भुसावळात पकडलेल्या गुटख्याची नाशिक परीक्षेत्रातील सर्वात मोठी कारवाई आहे.