बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखाची रोकड व दागिने लंपास
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कंडारी येथे बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख रुपयांची रोकड व दागिने चोरुन नेला आहे. भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, सुभाष पांडुरंग खैरे (वय-५८, रा. नागसेन कॉलनी, कंडारी ) हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. ते कुटुंबियांसह राहतात. १० ऑक्टोबररोजी रात्री १२.३० ते २ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दरवाजाचे कुलूप तोडले. कपाटातील दोन लाख रूपयांची रोकड आणि आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुभाष खैरे यांनी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोरट्यांवर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि विनोद कुमार गोसावी करीत आहे.