बेकायदेशीर व विनापरवाना कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या आरोपींना भुसावळात अटक !
भुसावळ (विशेष प्रतिनिधी)। बेकायदेशीर व विनापरवाना कत्तलीसाठी ५ गुरांना महिंद्रा पिकप वाहनामध्ये दाटीवाटीने गुरांचा जीवास इजा होईल असे कोंबुन तसेच गोवंश हत्या करण्यासाठी विनापरवाना अवैध वाहतूक करीत असलेले महिंद्रा पिकप वाहन व दुसरी कसे बेकायदेशीर व विनापरवाना कत्तलखान्यात ७ गुरांची कत्तल आढळून आल्याने संशयित आरोपींना भुसावळ मधून अटक करण्यात आली आहे
याबाबत माहिती अशी की, रात्री उशिरा २:४५ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार नफिस शेख अनवर (वय-२८) रा. फोफनागर ता.जि.बऱ्हाणपूर (म.प्र.) ह.मु.हिंगोणा ता.यावल हा महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच ४६ ई ४७२७) हा मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास पाच गुरांना विनापरवाना अवैध वाहतूक करीत असतांना आढळून आला तसेच भुसावळातील गुरांच्या कत्तलखान्यात विनापरवाना व बेकायदेशीरित्या दोन व्यक्ती शहरातील गौसिय नगर भागात सत्तार पहेलवान यांच्या गल्लीत कब्रस्तानाच्या बाजुला संशयित आरोपी नुरोद्दिन शेख सलाउद्दिन (वय-३७) रा. गौसिय नगर यांच्या ताब्यातील सात गुरे रात्री १२ वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सपोनि अनिल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील तपास पोहेकॉ जयेंन्द्र पगारे करीत आहे.