महिला सुरक्षे बाबत कठोर नियम लागू करणे अनिवार्य; वांजोला अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार पाश्वभूमीवर पल्लवी सावकारेची संतप्त प्रतिक्रिया
भुसावळ(प्रतिनिधी)। तालुक्यातील वांजोळा गावात दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एका नराधमांने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडल्याने अशी संतप्त भावना जि.प.सदस्या पल्लवीताई सावकारे यांनी व्यक्त केली आहे.
रोज संपूर्ण देशा सह,राज्यात ही महिलांवर अत्याचारांच्या घटना दिवसेन-दिवस वाढत असल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने महिला सुरक्षतेबाबत कठोर नियम लागू करणे अनिवार्य आहे. भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावातील एका पाच वर्षीय मूकबधिर मुलीवर तिच्या काकानेच दुपारी बलात्कार झाल्याची घटना ही घृणास्पद आहे. भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात बलात्कार झाल्याच्या घटनेची माहिती जिल्ह्या परिषद सदस्या पल्लवीताई सावकारे यांना कळविताच वेळेचा विलंब न करता त्यांनी प्रथम डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेऊन मुलीची व आईची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तुम्हाला न्याय मिळवून देवू, असे आश्वासन देखील सौ. सावकारे यांनी दिले. बलात्काराची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पोलीस अधिकारी महिती देण्यास टाळाटाळ करतात.हे अत्यंत चुकीचे असून झालेल्या घटनेची माहिती ही पोलिसांनी तत्काळ प्रसार माध्यमांना देणे, आवश्यक असल्याचे जि.प.सदस्य पल्लवीताई सावकारे यांचे वैयक्तिक मत त्यांनी पत्रकारासमोर मांडले. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असतील तर सरकारने आरोपीना कठोर शासन करून करून तत्काळ निर्णय घेऊन भर चौकात फाशीवर लटविण्यात यावे.जेणे करून अशी घटना करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे. यासाठी जिल्ह्या परिषद सदस्य जळगाव पल्लवीताई सावकारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती दिली असून या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.