भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

चैन स्नेचींग मधील अट्टल आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ बाजारपेठ पो.स्टे चे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अट्टल चैन स्नेचींग करणारा आरोपी नामे मझर अब्बास जाफर, वय 18 वर्षे, रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ याची माहिती काढुन त्यास ताब्यात घेतले असता त्याने अमळनेर पो. स्टे सीसीटीएनएस गुरन ००३०/२०२५ बि.एन.एस 309(4) प्रमाणे व जलम पो.स्टे. खामगाव तालुका गुरन 275/2025 बि.एन.एस 309(3),4 (5) प्रमाणे हे गुन्हे केले असल्याची कबुली दिली.

आरोपी मझर अब्बास जफर  याने अनुक्रमे 90,000/- रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 70.000/- रुपये किमतीची 14.05 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असे एकुण 1,60,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागीणे जबरीने चोरी केलेले आहे. सदर आरोपीस पुढील कारवाई करीता अमळनेर पो.स्टे.च्या तपासी अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

वर नमुद प्रकरणातील कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पो. स्टे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो. स्टे चे पो.उपनि. मंगेश बाधन, पोहेकों विजय नेकरक, पो. कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ.योगेश माळी, पो.कॉ. राहुल वानखेडे, पो. कॉ. भुषण चौधरी, पो. कॉ. सचिन चौधरी, पो.कॉ. अमर आढळे, पो.कॉ.पो. कॉ. योगेश महाजन अंशानी कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!