भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ हत्याकांड : मुख्य संशयित आरोपी करण पथरोड ला दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस सह अटक

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी करण पथरोड याला नाशिक मधील द्वारका परिसरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने त्याच्या कडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस हस्तगत केले आहे

भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला असल्याची माहिती नाशिक शहरात भद्रकाली पोलीस ठाणे हद्यीत गुंडाविरोधी पथकाला मिळाली त्या नुसार गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी द्वारका येथे पथकासह सापळा लावला. संशयीत हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसुन आल्याने तो पोलीसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी करण किसन पथरोड .वय २० रा. ७२ खोली वाल्मीक नगर भुसावळ. याचेकडुन गुन्ह्यात वापरलेली २ देशी पिस्टल व ५ काडतुसे असे एकुण ८४ हजार ४२०/- रुपयाचा मुद्येमाल जप्त करुन त्याला पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, नाशिक शहर संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, राजेश सावकार, सुनिल आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!