आमदार संजय सावकारे यांना कोरोनाची लागण !
भुसावळ : देशासह राज्यात बऱ्याच राजकीय पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधी यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. त्यात जिल्ह्यातील भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अँन्टीजन टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर ते गोदावरी रुग्णालयात सोमवारी उपचारार्थ दाखल झाले आहेत. अॅन्टीजन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. त्यांच्या कडुन , माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व घाबरून जाण्याचे कारण नाही निश्चितपणे आजारावर मात करता येते, असेही सावकारे म्हणाले.