हतनुर धरणाचे २४ दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा
भुसावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हंगामाच्या सुरवातीला जून महिन्यात पावसाचा पत्ताच नसल्याने मान्सूनचा लहरीपणा अनुभवयास मिळाला तरी जुलैच्या सुरुवातीपासून सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडला एव्हढेच नाही तर मध्यप्रदेशात तापी नदी पत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हतनूर धरणात पाण्याच्या साठयात मोठी भर पडली ,त्यामुळेच भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाचे २४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
गेल्या ८ दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याने ४ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याल आले आहेत तर २० दरवाजे एक मीटरने उघडले आहेत.
३८ हजार १०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
धरणातील अधिकच्या पाणीसाठ्याने नुकसान होऊ नये म्हणून एक विशिष्ट पातळी ओलांडल्यानंतर दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला जातो. सध्या हतनुर धरणामध्ये पाणीपातळी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ३८ हजार १०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला असून आता तापी नदीकाठच्या २६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
२६ गावांना सतर्कतेचा इशारा
हतनुर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि ३० दरवाजे हे १ मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात अचानक पाणी वाढले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाणी साठ्यात वाढ होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. शिवाय अजूनही विदर्भात पावसाचा जोर वाढला तर परस्थितीनुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.