वरणगाव येथे अल्पवयीन १३ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग
वरणगाव, ता.भुसावल. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणी सह शाळेत जात असताना दोघांनी तिचा पाठलाग करून अंगावर फुले फेकून विनयभंग केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे घडली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील १३ वर्षाची अल्पवयीन मुलगी मैत्रिणीसह शनिवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शाळेत जात असतांना रमेश चंद्रकांत पाटील आणि संतोष जानकीराम कोलते, दोन्ही रा. विठ्ठल मंदीर वेल्हाळे, ता.भुसावळ यांनी मुलींचा पाठलाग करत त्यांच्या अंगावर फुले फेकून विनयभंग केला.
पिडीत मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यावर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.