स्टेट बॅँकेच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा.
Monday To Monday NewsNetwork।
भुसावळ (प्रतिनिधी)। भुसावल येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे अधिकारी नंदलाल पाटील व विशाल इंगळे यांनी कोरोडोचा भ्रष्टाचार केला असून एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप उद्योग आघाडीचे भुसावळ शहराध्यक्ष अर्जुन खरारे यांनी मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांच्याकडे केली आहे.
दिनांक २४ जून २०२० व २१ ऑक्टोंबर २०२० ला नंदलाल पाटील व विशाल इंगळे हे दोघेही स्टेट बँक ऑफ इंडिया आनंद नगर, शाखा भुसावळ, जामनेर रोड येथे कार्यरत असून भ्रष्टाचार करत आहेत. या दोघांविरुद्ध मी तक्रार अर्ज जळगाव रिझनल मॅनेजर व यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराविरूद्ध तक्रार दिली होती. जळगाव एसबीआयचे रिझनल ऑफिसर यांच्याद्वारे मला २३ फेब्रुवारी २०२१ ला पत्र प्राप्त झाले असून त्यात आपण केलेल्या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. परंतु मला एक खंत वाटते की, करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध होऊनही नंदलाल पाटील व विशाल इंगळे तसेच लोनधारक यांच्या विरुद्ध पोलीस स्थानकात अन्य संस्थांनी एफआयआर सुद्धा दाखल केली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे लॉन डिपारमेंटचे मुख्य प्रबंधक रविंद्र सराळे यांनी सुरुवातीलाच दोन्ही मॅनेजर ला क्लीन चिट दिली होती. सदर भ्रष्टाचाराचे मुख्य तपास अधिकारी हेच आहेत. तरी आरोपी रविंद्र सराळे, विशाल इंगळे, रवींद्र पाटील, लोनधारक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी, असे भुसावळ उद्योग आघाडीचे भाजप शहराध्यक्ष अर्जुन खरारे यांनी मुंबई स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .