भुसावळ तालुक्यातील एक गुन्हेगार हद्दपार
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा वेग आला असून तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील एकास जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यासाठी उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिकार्यांकडे पोलिस प्रशासनाने पाठवले आहेत. त्यानुसार तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील अजय प्रकाश तायडे याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी ंहद्दपार करण्यात आल्याचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी जारी केले आहेत. भुसावळ तालुका पोलिसात कलम ३७९ नुसार चोरीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या अजय तायडे याला २०१५ मधील गुन्ह्यात त्याला चार हजार रुपये दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली होती.
तर हद्दपार चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू असताना संशयीताविरोधात नव्याने एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. डीवायएसपी वाघचौरे यांच्याकडे या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर हा प्रस्ताव प्रांतांकडे रवाना करण्यात आला होता. यानंतर आता प्रांताधिकार्यांनी याला मंजुरी दिल्यामुळे तायडे याला हद्दपार करण्यात आले आहे.