पावणेदोन लाखाचा गुटखा पकडला, भुसावल पोलीसांची मोठी कारवाई
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल येथे बेकायदेशीर रित्या गुटखा,तंबाखू व पानमसाला घेऊन जाणाऱ्या वाहनावर भुसावळ शहर पोलिसांनी कारवाई करत सुमारे १ लाख ७४ हजार ३१४ किमतीचा मुद्देमाल पकडला.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, एक व्यक्ती नॅनो कारमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखू आणि पानमसाला घेऊन जात असल्याची माहिती भुसावल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. गुरुवारी २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास पथकाने कारवाई करत भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलाजवळ नॅनो कार क्रमांक एमएच १२ जेझेड ६७१६ ही कार अडवून कारचालक किशोर राजकुमार आगीचा रा. सिंधी कॉलनी, भुसावळ याची चौकशी केली असता कारमध्ये अवैधरित्या गुटखा व पानमसाला घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यातून पोलिसांनी १ लाख ७४ हजार ३१४ रुपये किंमतीचा मुद्देमालासह गुटखा हस्तगत केला . या बाबत शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी आरोपी किशोर राजकुमार आगीच्या याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.