अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला गोड गोड बोलून तुला काही सांगायचंय असे सांगून दुचाकीवर बसवून जंगलात नेले तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघळकीस आली.
गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड हा तरुण सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मागावर होता ,२१ जूलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास पीडित मुलीशी मुद्दाहुन बोलण्याचा बहाणा करत तुझ्या काका बद्दल मोबाईल मध्ये काहीतरी आहे ते तुला दाखवायचे आहे असे सांगत पिडीतेला दुचाकीवर बसवून पिंप्रीसेकम शिवारातील जंगलात घेऊन गेला. तिथे तिला मारहाण करून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.पीडित मुलीने या बाबत पोलिसस्टेशनला तक्रार दिल्याने भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड रा. भुसावळ याचे विरोधात गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे.