अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच असताना भुसावळ शहरात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली.
समोर आलेली धक्कादायक घटना अशी की, १२ वर्षीय मुलीला लग्नाचे आामिष दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना भुसावल शहरात घडली.पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, संशयित आरोपी भावेश याने सर्वप्रथम २३ जुलै रोजी शाळेच्या गेटवर पीडित मुलीस बोलावून तिची भेट घेतली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तो तिला त्याच्या स्कुटीवर बसवून सात नंबर पोलिस चौकीच्या मागे पडीक रेल्वे क्वार्टरच्या रुममधे घेवून गेला. तू मला खुप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पून्हा १९ ऑगस्ट रोजी त्याने तिला शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटीवरून बसवून नेत जामनेर रोडवरील एका धार्मिक स्थळानजीक एका गार्डनमधे नेले. त्याठिकाणी देखील भावेशने पीडितेसोबत अंगलटपणा केला. तसेच गेल्या दोन महिन्यापासून सतत पीडितेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवले.पीडितेच्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश योगेश तायडे (वय १८) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.