भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

“सिमी” प्रकरणातील फरार आरोपीला भुसावळ मधून अटक, दिल्ली स्पेशल सेलची मोठी कारवाई

भुसावळ,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ दिल्ली येथील २००१ मधील दाखल झालेल्या “सिमी” प्रकरणातील फरार झालेल्या हनीफ शेख मोहम्मद हनीफ या संशयित आरोपीला दिल्ली स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यानी भुसावळ मधून अटक केल्याने भुसावळ शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

१६ अधिकारीकाऱ्यांची गोपनीय कारवाई
२००१ मधील “सिमी” या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित गुन्हा दाखल असलेल्या ऐका प्रकरणात फरार असलेल्या आरोपीस दिल्ली स्पेशल सेलच्या १६ अधिकाऱ्याच्या पथकाने दि.२२ फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी भुसावळ स्थनिक बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी हनीफ शेख मोहम्मद हनीफ,वय ४७ वर्ष, दत्तनगर, मेहराज बिल्डिंग, खड्का रोड, भुसावळ याला ताब्यात घेतले,ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने करण्यात आली. संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड देण्यात आला असून या वेळी सत्र न्यायालय आवारात मोठी गर्दी जमली होती.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक पवनकुमार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, दिल्लीतील न्यू फ्रंट कॉलनी पोलीस स्थानक २८ सप्टेंबर २००१ युएपीए कायदा तसेच १५३ अ, १५३ ब आणि १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल आहेत. गुन्हा दाखल असल्यापासून हानिफ शेख हा फरार होता. दरम्यान, २००१ मधील गुन्हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’ शी संबंधित असल्याचेही त्यांनी सांगीतले. अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी केली आणि भुसावळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून ४८ तासांचा ट्रांझिस्ट रिमांड घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांचे विशेष पथक तात्काळ दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, संशयित हानिफ शेख हा खडका रोडवरील पालिकेच्या उर्दू शाळेत शिक्षक असल्याची माहिती मिळत असून २००१ मध्ये प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘सिमी’चे निघणारे ‘इस्लामिक मुव्हमेंट’ नामक मासिकमध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यात हानिफवर आरोप असल्याचेही कळते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!