भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने केल्या रद्द

भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे छत्तीसगडमधील बिलासपूर विभागातील इंगूर स्टेशन ते रायगड झारसीगुडा सेक्शनमध्ये चाैथ्या लाइनचे काम सुरू होत आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या तब्बल ३६ गाड्या रेल्वे प्रशासनाने २० ते ३० ऑगस्ट दरम्यान रद्द केल्या आहेत. यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर भुसावळ विभागातून पुणे, मुंबई, अहमदाबादकडे जाणाऱ्यांची गैरसोय होईल.

या गाड्या रद्द

संत्रागाची-पुणे (२० व २७), पुणे-संत्रागाची (२२ व २९), शालिमार-पाेरबंदर (२६ व २७), पाेरबंदर-शालिमार (२४ व २५), पुरी-जाेधपूर (२४), जाेधपूर-पुरी (२७), शालिमार-अाेखा (२३ व ३०), अाेखा-शालिमार (२१ व २८), मालदा टाऊन-सूरत (२० व २७), सूरत-मालदा टाऊन (२२ व २९), हावडा-पुणे- हावडा (दाेन्ही बाजूची २१ व २८), संत्रागाची-पाेरबंदर (२८), पाेरबंदर-संत्रागाची (२६), संत्रागाची-एलटीटी (२६ व २७), एलटीटी-संत्रागाची (२४ व २५), भुवनेश्वर-एलटीटी (२२,२५,२९), एलटीटी-भुवनेश्वर (२४,२७ व ३१), हटिया-एलटीटी (२६,२७), एलटीटी-हटिया (२८ व २९), हावडा-शिर्डी साईनगर (२५), साईनगर शिर्डी-हावडा (२७), हावडा-मुंबई (२६), मुंबई-हावडा (२८), एलटीटी-कामाख्य (२० व २७), कामाख्य-एलटीटी (२३ व ३०),हावडा-मुंबई मेल (२१ ते २८ आठ दिवस), मुंबई-हावडा मेल (दि. २१ ते २८ आठ दिवस), अहमदाबाद-हावडा, हावडा-अहमदाबाद, शालिमार-एलटीटी व एलटीटी-शालीमार या गाड्या (२१ ते २८), हावडा-पुणे (२०,२५,२७), पुणे-हावडा (२२,२७, २९), हावडा-मुंबई (२२,२३,२४,२६), मुंबई-हावडा (२३,२४,२५, २८), हटिया-पुणे (२२,२६,२९), पुणे-हटिया (२४,२८ व ३१).

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!