क्राईमभुसावळ

भुसावल मध्ये तब्बल ५०० किलो गांजा जप्त, एलसीबीची मोठी कारवाई

भुसावल,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एलसीबीच्या पथकाने काल शुक्रवारी गुप्त माहितीवरून सापळा रचून भुसावळात तब्बल ५०० किलो गांजा पकडून , ७५ लाखांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य, दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला.

एल.सी.बी.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना भुसावल मध्ये वाहनात गांजा येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी एक पथक भुसावळला रवाना करून जळगाव रोडवर सापळा लावण्यास सांगितले. गुरुवारी रात्री पथकाला १०.१५ वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील जॉली पेट्रोल पंपाजवळ पुलाखाली एक वाहन बरेच वेळ थांबलेल्या अवस्थेत दिसले. यामुळे पथकाला शंका आली. पथकाने पाहणी करून लागलीच याबाबत अधिकाऱ्यांना कळविले. अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पथक रात्रभर वाहनावर लक्ष ठेवून होते.

गुरुवारी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी वाहन असलेल्या ठिकाणी दुपारी दोन वाजेला भेट दिली. आणि वाहन भुसावळ तालुका पोलील स्टेशनला आणण्याचे आदेश दिलेत. पथकाने केलेल्या चौकशीत वाहनात वाहनांमध्ये गांज्याच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे असे ४० गठ्ठे एकूण ५०० किलो ६०० ग्रॅम असा ७५ लाखांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य मिळून आले. पथकाने दहा लाख रुपयांच्या आयशर वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.फरार वाहन चालक अक्रम शेख याला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मालेगाव येथून ताब्यात घेतले ही कारवाई उपनिरीक्षक गणेश चौबे, कर्मचारी सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी यसनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!