भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळराजकीय

अनिल चौधरी यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथील माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू त्यांच्या उपस्थितीत प्रहार जनशक्ती या पक्षात प्रवेश केला आहे.

अनिल चौधरी हे अमरावती येथे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून त्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला असून त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याचे माहिती मिळत आहे. चौधरी यांनी काही वर्षपूर्वी भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. माजी मंत्री गिरीश महाजन यांची विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख होती. त्यांनी २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. यात ते पराभूत झाले होते. एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात प्रहर जनशक्ती पक्ष चौधरी यांच्या प्रवेशाने येणाऱ्या निवडणुकामध्ये दावेदार असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!