सात दुचाकींसह तीन चोरट्यांना भुसावळ पोलिसांनी केली अटक
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल परिसरा सह जळगाव, अमळनेर, परिसरातून चोरी केलेल्या दुचाकींसह तिघा चोरट्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली असून तिघांकडून ७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने २० ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता भुसावळ शहरात कारवाई करत सैय्यद शहारुख सैय्यद रहेमान, वय-२९, रा. पंचशिल नगर भुसावळ. याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्यांने अमळनेर, जळगाव आणि भुसावळ शहरातून त्याचे साथीदार दानिश उर्फ गोलू शरीफ खान ,वय-२४ रा. दिन दयाल नगर, भुसावळ, आणि कामीलोद्दीन अजीजउद्दीन वय-३०, रा. फैजपुर ता. यावल. यांचे सोबत ७ दुचाक्या चोरी केल्याचे सांगितले.पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून या तिघांकडून चोरीच्या ७ दुचाकी ही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता तिघांनाही ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीकारी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचीन चौधरी यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ विजय बळिराम नेरकर हे करत आहेत.