भुसावल तालुका खुनानं हादरला, २६ वर्षीय तरुणांची हत्या
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर भुसावल तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्रा जवळ भावेश अनिल भालेराव वय-२६, रा. भगवान साळवे नगर, फेकरी ता. भुसावळ. या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना घडली.
भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर येथे राहत असलेल्या भावेश भालेराव सोबत काही तरूणांचा किरकोळ कारणावरून वाद झालेला होता. या वादातून त्याच्या मानेवर डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला, हा प्रकार शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता उघळकीस आला. त्यांचा मृतदेह फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्रा जवळील काटेरी झुडूपाजवळ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित आरोपी रोशन बबन हुसळे,वय २८ वर्ष, रा फेकरी याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार रोशन बबन हुसळे व मयत भावेश भालेराव यांच्यात पैशांवरून वाद होता, भावेश रोशन कडे सातत्याने तगादा लावत होता, शनिवारी दुपारी देखील दोघांमध्ये वाद होऊन चाकूने वार करून भावेशचा खून करण्यात आला.आरोपी रोशन हुसळे हा कोपरगाव येथे पळून जाण्यापूर्वी च त्याला पोलिसांनी अटक केली रोशन हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग चा खेळाडू असल्याची माहिती मिळत असून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे,वाल्मिक सोनवणे, प्रेम सपकाळे, श्यामकांत मोरे अशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन मयत भावेश भालेराव यांचे शवविच्छेदनांसाठी ट्रामा केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले आहे. या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.