भुसावल मध्ये खूनसत्र सुरूच; पोलीस चौकीजवळच तरूणाची क्रूर हत्या
Monday To Monday NewsNetwork।
भुसावळ,(प्रतिनिधी)। शहरात काही दिवसांपूर्वी याच रोडवर पुढे याच परिसरात एकाची हत्या झाली होती. यानंतर पुन्हा एकदा तरुणांची क्रूर हत्या आणि ती देखील पोलीस चौकीच्या जवळच झाल्याने एकच खळबळ उडाली.शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकीच्या परिसरात काल रात्री एकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत अधिक महिती अशी की, शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील पोलीस चौकी क्रमांक सातच्या परिसरातील मशिदीच्या समोर आज सकाळी पत्र्यांच्या खाली एक मृतदेह आढळून आला. आज सकाळी याबाबतची माहिती उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी याबाबतची शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. यानंतर पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील अरूण इंगळे रा. समतानगर रेल्वे दवाखाना मागे, भुसावळ असल्याचे भुसावल पोलिसांकडून निष्पन्न झाले. तर या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर हा खून रात्री बाराच्या सुमारास झाला असून मयताच्या अंगावर धारदार हत्याराचे वार करण्यात आले असून त्याला दगडाने ठेचण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती जाणून घेतली. त्यांच्या सोबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे आणि कर्मचारी होते.