ब्रेकिंग ; भुसावल मध्ये मुलानेच केला आई व पत्नीचा खून, शालक गंभीर जखमी
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुन्हेगारी कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असणार्या भुसावळ शहरात काल रात्री पुन्हा दोन खून झाल्याने परिसर हादरला. रेल्वे कर्मचारी हेमंत कुमार भूषण याने कौटुंबिक वादातून आई सुशीलादेवी आणि पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण यांना ताव्याने जीवे मारून शालकावर देखील प्राणघातक हल्ला केल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
भुसावल शहरातील वांजोळा रोडवरील शगुन इस्टेट येथील रहिवासी हेमंत कुमार भूषण या रेल्वे कर्मचार्यांने कौटुंबिक वादातून तव्याने मारहाण करत आई सुशीलादेवी वय वर्षे ६० वर्ष , पत्नी आराध्य हेमंत कुमार भूषण, वय २४ वर्ष यांना मारून टाकले. हेमंत हा रेल्वे कर्मचारी असून अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. आज पहाटे चारच्या सुमारास हे कृत्य घडल्याची माहिती समोर आली.
जखमी शालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या भयानक कृत्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड,सपोनि मंगेश गोंटला, हरिष भोये पोहचले असून आरोपी हेमंत कुमार भूषण याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे..